Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

न्यू इंग्लिश स्कूल सुरवडी येथे सखी सावित्री समितीची बैठक संपन्न

  


फलटण चौफेर दि २७

 न्यू इंग्लिश स्कूल सुरवडी या विद्यालयामध्ये सखी सावित्री समिती आणि विशाखा समितीची संयुक्त सभा पार पडली. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या आदेशाने प्रत्येक माध्यमिक विद्यालयामध्ये सखी सावित्री समिती विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थापन केलेली आहे.

या समितीच्या सभेमध्ये शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मुद्द्यांच्या वरती चर्चा करण्यात आली. लवकरच विद्यालयामध्ये सीसीटीव्ही बसवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. 

विद्यालयातील विद्यार्थ्यांना चिराग ॲप आणि चाइल्ड हेल्पलाइन नंबर 1098 बद्दल माहिती देण्यात आली. विद्यालयामध्ये तक्रार पेटी कार्यान्वित करण्याचे ठरले.सभेच्या अध्यक्षस्थानी सौ पल्लवी वाघ  होत्या. शासकीय आदेशानुसार   विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री घाडगे सर या समितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत .या सभेच्या सुरुवातीला निंभोरे केंद्राचे नवनियुक्त केंद्रप्रमुख  सोमनाथ लोखंडे यांचा सत्कार घेण्यात आला.या सभेसाठी मा. श्री.लोखंडे साहेब आणि मा. श्रीरंग पवार (भाऊ) हे समुपदेशक म्हणून उपस्थित होते .

 याप्रसंगी सौ.अश्विनी गुजर मॅडम (आरोग्य अधिकारी) आणि  मा. श्री बाळासाहेब जगताप (काका) व मा.श्री. संतोष पवार (पोलीस पाटील) यांनी मार्गदर्शन केले. या सभेसाठी सदस्य म्हणून सौ.लीना जाधव (महिला ग्रामपंचायत सदस्या), सौ. दैवता भोईटे ( अंगणवाडी सेविका ), सौ.नीलम जगताप (आशा सेविका ), सौ.मनीषा कोकरे व सौ उषा शिंदे (पालक प्रतिनिधी) इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या सभेचे प्रास्ताविक सौ.दिपश्री कुदळे मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन  विजय साळुंखे सर यांनी केले. या सभेसाठी श्री.बबलेश्वर सर,  सोनवले सर,  मोहिते सर,  गोडसे सर यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.