Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सासकलच्या सुपर केन नर्सरीला फलटण तालुक्यातील मंडळ कृषी अधिकाऱ्यांची भेट

 


फलटण चौफेर दि २८

कृषी विभागा च्या मार्गदर्शन खाली सासकल ता फलटण जिल्हा सातारा येथे सुपर केन नर्सरी तयार करण्यात आले आहे उसाचे एकरी शंभर टन लक्ष ठेवण्यात आले आहे डॉक्टर बाळकृष्ण जमदागणे सुपर के नर्सरी जनक यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार कृषी विभागामार्फत सासकल येथील शेतकऱ्यांना सुपर केन नर्सरीच्या तंत्रज्ञान बाबत शेतकरी मेळावे प्रक्षेत्र भेटी, प्रात्यक्षिकाद्वारे, शेतकऱ्यांमध्ये नर्सरी बाबत प्रचार व प्रसार करून शेतकऱ्यांना या आधुनिक तंत्रज्ञान  बाबत प्रोत्साहित करून सासकल गावामध्ये एकूण  ५ शेतकऱ्यानी सुपर केन नर्सरी तयार केले आहे 

यावेळी संतोष मुळे व मच्छिंद्र मुळीक या शेतकऱ्यांच्या सुपर केन नर्सरी व   नर्सरी द्वारे तयार करण्यात आलेल्या ऊस रोप लागवड प्रक्षेत्र भेट देऊन शेतकऱ्यांचे अभिनंदन  मंडळ कृषी अधिकारी यांनी केले 

सुपर केन नर्सरी मध्ये २१ दिवसात रोपे तयार होते ४.५ फूट सरी अंतर असून २ फूट दोन रोपातील अंतर ठेवून लागवड करण्यात आले आहे 

यावेळी मंडळ कृषी अधिकारी फलटण सतीश निंबाळकर,मंडळ कृषी अधिकारी विडणी शहाजी शिंदे, मंडळ कृषी अधिकारी तरडगाव पूजा दुदुस्कर, कृषी पर्यवेक्षक अशोक जगदाळे, कृषी पर्यवेक्षक तरडगाव महावीर पवार तसेच कृषी सहाय्यक सेवा रत्न पुरस्कार  सचिन जाधव  तसेच शेतकरी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.