फलटण चौफेर दि २९ तरडगाव ता फलटण येथील शहीद जवान हनुमंत गायकवाड यांच्या वीर पत्नी श्रीमती रुक्मिणी हनुमंत गायकवाड यांना शासनाकडून खामगाव ता फलटण येथील गट नंबर २९० मधील शासकीय मालकीची पाच एकर जमीन प्रधान करण्यात आल्याची माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली शहीद जवान हनुमंत गायकवाड हे १९८८ साली श्रीलंका येथे ऑपरेशन पवन दरम्यान शहीद झाले होते शासनाच्या २०१८ सालच्या अध्यादेशानुसार शहीद जवानांच्या वारसांना जमीन देण्याची तरतूद असून त्यानुसार वीर पत्नी रुक्मिणी गायकवाड यांना खामगाव येथील पाच एकर जमीन वाटप करण्यात आल्याचे माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली यावेळी तहसीलदार डॉ अभिजीत जाधव, नायब तहसीलदार तुषार देशमुख उपस्थित होते