फलटण चौफेर दि २९
निंबळक ता फलटण गावाच्या हद्दीत घराच्या चार गुंठे जागेच्या वादावरून सख्या भावाने व दोन पुतण्यांनी काठीने मारहाण व डोक्यात कुऱ्हाड घातल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत संशयित नितीन प्रकाश चव्हाण, हेमंत प्रकाश चव्हाण व भाऊ प्रकाश रामचंद्र चव्हाण रा निंबळक ता फलटण यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिथून मिळालेली अधिक माहिती अशी,
फिर्यादी गजानन रामचंद्र चव्हाण वय ६५ रा निंबळक ता फलटण हे जमिन गट नंबर १२५ मधील घरांचे समोरील व आजुबाजुला जेसिबिच्या साहय्याने साफसफाई करीत असताना तेथे पुतण्या नितिन प्रकाश चव्हाण हातामध्ये काठी घेवुन, तसेच हेमंत प्रकाश चव्हाण हा त्याचे हातात लोखंडी पाते असलेली कु-हाड घेवुन व भाऊ प्रकाश रामचंद्र चव्हाण हे हातात दगड घेवुन आले. त्यांनी प्रथम मला शिवीगाळ करून नितीन यांनी माझ्या पाठीवर काठीने मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर हेमंत याने त्याचे हातातील कु-हाड माझे डोकीत मारून मला जखमी करून गंभीर जखमी केले. त्यानंतर मी जखमी झाल्याने खाली पडलो. त्यावेळी भाऊ प्रकाश याने माझे पोटावर दगड मारला.तसेच मला हाताने मारहाण करीत असताना माझे कारवरील ड्रायव्हर कानिफनाथ कदम हे मला त्याचे तावडीतुन सोडवित असताना त्यांनी माझा ड्रायव्हर कानिफनाथ यालाही हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास स फो मठपती करीत आहेत