Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिव्यांची लाखोली वाहत सुखेड व बोरी गावांमध्ये महिलांनी भरवला बोरीचा बार

 


फलटण चौफेर दि १०:  खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी गावात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आज दुपारी १२ च्या सुमारास   दोन्ही गावातील  महिलांनी एकमेकींना हातवारे करत शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार भरवला  सुखेड व बोरी या गावातील महिला गेली अनेक वर्षापासुन नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी बारानंतर दोन्ही गावाच्या दरम्यान जाणाऱ्या ओढ्यात येऊन शिव्यांची लाखोली वाहत असतात यावर्षी समाधानकारक पाऊस व बोरीच्या ओढ्यात धोम-बलकवडी कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.  बोरीचा बार शांततेत पार पडण्यासाठी दोन्ही गावातील ग्रामस्थांबरोबरच सपोनि सुशिल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आलेला होता

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.