Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रीमंत रामराजेंच्या हस्ते उद्या आसू येथे विविध भूमीपूजन, उद्घाटन व सत्कार समारंभाचे आयोजन

 


फलटण चौफेर दि १०

आसू ता फलटण गावामध्ये राष्ट्रवादी राजे गट  व आसु ग्रामस्थांच्या वतीने उद्या दिनांक ११ रोजी सायंकाळी ५ वाजता विधान परिषदेचे माजी सभापती आ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्यांचा  सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला  आहे कार्यक्रमाला फलटण कोरेगावचे आमदार दीपकराव चव्हाण हे अध्यक्षस्थानी असणार असून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे उद्या होणाऱ्या सत्कार समारंभामध्ये

कु. वैष्णवी विठ्ठल फाळके इन्कमटॅक्स अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल, नंदकुमार झांबरे डॉ. हनिमन जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल, ज्ञानदेव अशोक पवार एपीआय, गोरेगाव मुंबई येथे निवड झाल्याबद्दल,डॉ. हरिष नानासो पाटणकर पंतप्रधान यांच्या हस्ते प्रथम आयुष स्टार्टअप पुरस्कार मिळाल्याबद्दल, शुभम उत्तम पाटणकर (SP Productions) धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपट, म्युझिक डायरेक्टर,कु. समिक्षा संपतराव गाडे सहाय्यक अभियांत्रिकी, जलसंपदा विभाग,कु. शिवानी दयाराम बोडरे मुंबई पोलीस वचि. हर्ष विकास साबळे पश्चिम बंगाल येथे नॅशनल कबड्डी स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार होणार आहेत व यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची जाहीर सभा होणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.