Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्राध्यापक बुवासो तुपे यांचे सेट परीक्षेत उज्वल यश

 


फलटण चौफेर दि १२

सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे  यांच्यामार्फत ५ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आलेल्या  ३९ व्या “महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत(Maharashtra State Eligibility Test अर्थात MH-SET” परीक्षेमध्ये प्रा.श्री बुवासो महादेव तुपे यांनी  इंग्रजी या विषयातून उत्तीर्ण झाले आहेत. सदर परीक्षा ही असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी  आवश्यक असते .त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होणे हे प्रत्येक उमेदवाराचे ध्येय असते असते. त्यांच्या उज्वल यशाचे रहस्य म्हणजे त्यांची अफाट जिद्द  चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी इत्यादी गुणांमुळे ते या यश शिखरापर्यंत पोहोचू शकले. प्रा. श्री बुवासो तुपे हे फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग फलटण येथे ‘लेक्चरर इन कम्युनिकेशन स्किल्स’ या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या या स्पर्धा परीक्षेतील उज्वल आणि उत्तुंग यशाबद्दल  फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी, अरविंद निकम सर, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रा डॉ नरेंद्र नार्वे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.