साखरवाडी गणेश पवार
घाटकोपर व पुणे जिल्ह्यातील मोशी येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग विरोधात स्थानिक प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे मात्र फलटण तालुक्यातील साखरवाडी गावात मागील ७ वर्षापासून फ्लेक्स व होर्डिंग लावण्याला बंदी करण्यात आली आहे साखरवाडी ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच विक्रम सिंह भोसले यांनी अनेकांचा रोष पत्करून फ्लेक्स होर्डिंग बंदीचा निर्णय ग्रामसभेत ठराव संमत करून घेतला होता व मागील सात वर्षांपासून या निर्णयाची कडक अंमलबजावणी होत आहे
घाटकोपर येथील व त्यानंतर पिंपरी चिंचवड मोशी येथील होर्डिंग कोसळून १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला व मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा,जिल्हा प्रशासन अनेक ठिकाणी असणाऱ्या अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग विरोधात कारवाई करत आहेत साखरवाडी गावात ७ वर्षांपूर्वी गावातील एसटी स्टँड व प्रत्येक चौकात राजकीय पुढार्यांचे वाढदिवस, सामाजिक कार्यकर्ते, मिसरूड न फुटलेले काही स्वयंघोषित दादा, विविध महापुरुषांच्या जयंती,पुण्यतिथी कार्यक्रमाचे मोठ मोठाले फ्लेक्स संपूर्ण गावात लावले जायचे अनेकदा फ्लेक्स लावणाऱ्या लुंग्या सुंग्या दादांचे बगलबच्चे वर्ष वर्ष फ्लेक्स तुटून खाली पडेपर्यंत काढत नसायचे यामुळे अनेकदा वादविवादाचे प्रसंग सुद्धा घडत होते या फ्लेक्सबाजीमुळे गावाचे विद्रूपीकरण होत होते या सर्व गोष्टी टाळण्यासाठी साखरवाडीत मागील ७ वर्षापासून फ्लेक्स व होर्डिंग लावण्याला बंदी करण्यात आली आहे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याने आदर्श घ्यावा असा आदर्शवत निर्णय ७ वर्षांपूर्वीच साखरवाडी ग्रामपंचायत ने घेतला आहे अशा निर्णयाची सद्यस्थितीत किती मोठ्या प्रमाणात गरज आहे हे अशा दुर्दैवी घटना घडल्यानंतर लक्षात येते
पूर्वी साखरवाडीच्या एसटी स्टैंड वर फ्लेक्स लावणाऱ्यांच्यामध्ये स्पर्धाच लागलेली असायची यामुळे अनेकदा वाद सुद्धा व्हायचे गाव सुंदर व स्वच्छ असावे या भावनेने ७ वर्षांपूर्वी फ्लेक्स बंदीचा निर्णय घेतला होता विक्रमसिंह भोसले माजी सरपंच साखरवाडी