Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा अनेक ठिकाणी झाडे व घरांची पडझड

 



फलटण चौफेर  दि. २४ : फलटण शहरासह तालुक्याला काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याचा जोरदार तडका बसला  मागील १० ते १२ दिवसापासून संपूर्ण सातारा जिल्ह्यातील बहुतांशी भागात  अवकाळी पावसाने हाहाकार माजवला होता मात्र फलटण तालुका याला अपवाद होता काल रात्री ७.३० नंतर फलटण तालुक्यातील बहुतांश भागात  वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजासह असह्य उघड्यापासून सर्व सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे  मात्र वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडून वाहतूक विस्कळीत झाली  तसेच रावडी सूळ वस्ती येथील सौ राणी हनुमंत पांढरे यांच्या राहत्या घरासमोरील पत्र्याचे शेड उडून गेल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे  


१३ कर्मचाऱ्यांनी सुरवडी परिसरातील विद्युत पुरवठा  रात्री २ वाजता केला पूर्ववत


वादळी वाऱ्याने सुरवडीसह परिसरातील साखरवाडी, खामगाव, जिंती, होळ, फडतरवाडी, काळज येथील मुख्य वाहिनी वरती बिघाड झाल्याने संपूर्ण परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला होता  मात्र सुरवडी महावितरणच्या १३ कर्मचाऱ्यांनी पडत्या पावसात रात्री दोन वाजेपर्यंत या भागातील ९० टक्क्याहून हून अधिक विद्युत पुरवठा पूर्ववत केला व आज सकाळी सुद्धा  विद्युत पुरवठा खंडित असणाऱ्या ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम कर्मचाऱ्यांकडून चालू आहे



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.