साखरवाडी गणेश पवार
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करणारा शेतकरी दुधाला दर नसल्याने देशोधडीला लागला आहे शासनाचे प्रति लिटरला मिळणारे ५ रुपये अनुदान बंद झाल्याने ३.५ फॅट / ८.५ एसएनएफ या मिळणारा ३० ते ३२ रुपयाचा दर २४ ते २५ रुपयापर्यंत खाली आला आहे यामुळे उत्पादन खर्च व मिळणारे उत्पन्न यामध्ये सांगड घालने शेतकऱ्यांना कठीण झाले असून उत्पादन खर्चामध्ये २०१७ ते २०२४ या ७ वर्षांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे शेतकऱ्याचा दूध व्यवसाय तोट्यात येण्याची कारणे पुढील प्रमाणे
फॅट चोरी
दूध संघ व खाजगी दूध संकलन केंद्रांकडून केल्या जाणाऱ्या फॅट चोरीमुळे ३.५ डिग्री,८.५ एसएनएफ ची ३.४ व ८.४ दुधाची गुणवत्ता दाखवली तरी प्रति लिटर किमान २ रुपये दुधाचा दर कमी होतो दुधाच्या दुधाची फॅट चेक करणाऱ्या मशीनचे वेळोवेळी शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून कॅलिब्रेशन होते का? हा संशोधनाचा विषय आहे
पशुखाद्याचे वाढलेले दर
२०१७ साली पशुखाद्याच्या गोळी पेंडीच्या ५० किलो बॅगचे दर १०० ते ११०० रुपये व व मकेचा भरडा (भुसा) बॅग ९०० रुपयाला मिळत होती याच पशुखाद्यांचे दर सद्यस्थितीत १६०० ते १७०० व भुसा बॅग १५०० रुपये इतके वाढलेले आहेत बहुतांशी दूध संकलन संकलन करणारे संकलनचालकच शेतकऱ्यांना या पशुखाद्याची विक्री करतात त्यामुळे ते या दरांमध्ये अजूनही ५०/१०० रुपये अधिकचे लावतात
वजन काट्याची चोरी
बरेच दूध संकलन केंद्र चालक अजूनही तानाचा काटा वापरतात या तानाच्या काट्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच 'ताण' बसत असून यामध्ये किमान १०० लिटर मागे ४ लिटर दुधाच्या वजनाची चोरी केले जात असल्याचाही शेतकऱ्यांचा आरोप आहे व मान्यताप्राप्त काठ्यावरती काही शेतकऱ्यांनी हे वजन केले असता ४ लिटर १०० लिटर मागे ४ लिटरची तफावत आढळत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे
हिरव्या चाऱ्याची वाढलेले दर
२०१७ साली २००० ते २२०० रुपये पांड (दोन गुंठे)दर असणाऱ्या मक्याचा दर सध्याला ४००० ते ४५०० रुपये पर्यंत वाढला आहे दुधाचे अधिकचे उत्पन्न घेण्यासाठी बहुतांशी दूध उत्पादक शेतकरी हिरव्या चाऱ्यामध्ये मका पिकाचा वापर करतो मात्र हे दर वाढल्याने त्याचाही भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे
औषध उपचारांचा वाढता खर्च
गाई वेल्यानंतर गोचीड ताप होण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे यामध्ये ५ ते ६ हजार रुपये उपचाराचा खर्च दुधाच्या उत्पन्नात ५ ते १० टक्के दुधाचे उत्पन्न कमी होते तसेच गाईच्या सडाना मस्टडीज झाला तरीसुद्धा दुधाच्या उत्पन्नात ५ ते १० टक्के फरक पडतो व उपचारासाठी ५ ते ६ हजार रुपये खर्च येतो
मागील बऱ्याच दिवसांपासून दूध उत्पादक प्रचंड तोटा सहन करून दुग्ध व्यवसाय करीत आहे याकडे कोणतेच सरकार लक्ष देत नसल्याने सध्या दूध उत्पादक देशोधडीला लागला आहेअमोल खराडे दूध उत्पादक तडवळे