फलटण चौफेर दि २२
साखरवाडी तालुका फलटण गावाच्या हद्दीत ताडीची चोरटी विक्री केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला असून नागराज मुदाप्पा भंडारी वय ३५ रा साखरवाडी असे संशयताचे नाव आहे दिनांक २० रोजी रात्री ८ वाजण्याचा सुमारास संशयित त्याच्या घराच्या आडोशाला ३४० रुपये किमतीचे ताडीचे प्रत्येकी एक लिटरचे प्लास्टिकचे १७ फुगे विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचे आढळून आला पुढील तपास सहाय्यक फौजदार सावंत करीत आहेत