फलटण चौफेर दि १८
सुरवडी ता फलटण गावातील भर वस्तीत असणाऱ्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे २० तोळे सोने व चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला या घटनेने सुरवडीसह परिसरात खळबळ उडाली असून फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत घटनास्थळ व फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहिती नुसार,फिर्यादी अमोल विलासराव भोसले वय ४४ रा सुरवडी ता फलटण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसह दि १६ रोजी सकाळी ११ वाजता बँकेच्या कामानिमित्त फलटणला गेलो होतो दुपारी १.४५ वाजता माघारी आलो असता घराच्या गेटचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत त्यांना दिसले त्यानंतर घराच्या लोखंडी दरवाज्याचा कोयंडा तोडून बेडरूम मधील दोन लोखंडी कपाटातील लॉकर तोडून सोन्याचे साडे एकोणीस तोळे व चांदीची गणपतीची मूर्ती,निरंजन,ताट असा ४ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे

