विडणी(योगेश निकाळजे)- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त फलटण तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने शासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या तसेच नोटरी व सरकारी वकीलपदी नियुक्त झालेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. तदनंतर सकाळी १०.३० वाजता सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल अशोका येथील सभागृहात होणार आहे.
यावेळी फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, फलटण शहर चे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, मुख्याधिकारी निखिल मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
