फलटण चौफेर दि २६
लोणंद पोलिसांनी २०१० मधील दाखल असलेल्या घरपोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस तब्बल १४ वर्षानंतर जेरबंद केले चोच्या ऊर्फ शुभम राज्या शिंदे वय ३८ रा. शेळकेवस्ती लोणंद ता. खंडाळा जि. सातारा याने गुन्हा केलेपासुन तो मागील १४ वर्षापासून फरारी होता.
संशयित आरोपी चोच्या ऊर्फ शुभम राज्या शिंदे हा त्याचे घरी दि २६ रोजी येणार असल्याची माहीती मिळाल्याने सपोनि सुशिल भोसले यांचे मागदर्शनाखाली लोणंद पोलिसांच्या पथकाने शेळकेवस्ती लोणंद येथे त्याचे घराचे आजुबाजुला सापळा रचला. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास फरारी आरोपी चोच्या ऊर्फ शुभम शिंदे हा घरी आला त्यावेळी पथकातील अंमलदार यांनी एकाचवेळी कारवाई करुन अचानक त्याचे घरी झडप टाकली व चोच्या ऊर्फ शुभम शिंदे याला ताब्यात घेतला. त्याला पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचे अटकेची कारवाई केली व त्यानंतर आरोपीस मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी सोो, फलटण न्यायालय यांच्यासमोर हजर केले असता त्याची १४ दिवस न्यायालयीन कोठडी मंजुर झाली आहे.
सदरची कारवाई ही मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सुशिल भोसले सहा. पोलीस निरीक्षक, पोहवा संतोष नाळे, पोहवा. नितीन भोसले, पोना बापु मदने, पोकॉ. विठठल काळे, पोकॉ. अभिजित घनवट यांनी कारवाईत सहभाग घेतला