फलटण चौफेर दि २६ वाठार निंबाळकर ता फलटण गावच्या हद्दीत फलटण पुसेगाव रस्त्यावर दि २५ रोजी सायंकाळी ४ वा आयशर टेम्पो क्र एम एच १४ जीडी ५६३० वरील अज्ञात चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणाऱ्या दुचाकी क्र एम एच ११ सीबी ८९९१ ला समोरून ठोकर दिल्याने दुचाकीस्वार गणेश सोनबा मदने वय २५ रा वाठार निंबाळकर ता फलटण याचा डोक्याला झालेल्या गंभीर दुखतीमुळे मृत्यू झाला घटनेची फिर्याद महावीर बापू मदने यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे