संभाजी पुरीगोसावी (प्रतिनिधी) महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मौजे. मांघर गावच्या हद्दीमध्ये महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी,कर्मचारी हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एका ईटिंगा कारचा संशय आला गाडी थांबवून तिची तपासणी केली असता. सदर कारचालक हर्षल सिंधनकर याने मधपान केल्याचे निदर्शनास आले, सदर ईटिंगा कारची चांगलीच तपासणी पोलिसांनी केली असता. फिरायला आलेल्या पर्यटकांच्या गाडीतच मागील सीटवर दोन विदेशी दारुच्या बाटल्या आढळून आल्या. यावेळी कारचालकासह सोबत असणाऱ्या सुभाष रामचंद्र मानिक (रा. उदना पोस्ट बालीपुर ता. हुगळे ) यांच्या विरोधांत मुंबई दारुबंदी अधिनियम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई मध्ये ईटिंगा कार सह विदेशी दारु असा एकुण १०,०१,८०० /रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. किरण चव्हाण,जांभळे अंकुश पोळ यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शेलार करीत आहेत.*