फलटण चौफेर दि २३ एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना अनेक विद्यार्थी करिअरच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी क्षेत्रे निवडत असतात , अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढले असून विद्यार्थ्यांनी आणखीन जास्तीत जास्त प्रमाणात स्पर्धा परीक्षेत सहभाग नोंदवावा. असे मत आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.गणेश तांबे सर यांनी व्यक्त केले. ढवळगावचे सुपुत्र चि.वैभव दिलीप गारडे यांने S.T.I परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केल्याबद्दल सत्कार करत असताना त्यांनी हे मत व्यक्त केले. वैभव गारडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे उज्वल यश संपादन केले असून या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य,मार्गदर्शक शिक्षक व सहकारी मित्रांना दिले असून हे यश संपादन करत असताना अभ्यासाचे काटकरपणे नियोजन तसेच ताज्या घडामोडींचा अभ्यास याचे सूक्ष्म नियोजन, जिद्द, चिकाटी, मना निर्माण करून त्यांनी या परीक्षेमध्ये हे संपादन केले आहे.
भविष्यात एवढ्यावरच न थांबता आणखीन उच्च पदाला गवसणी घालण्याचा विचार वैभव याने यावेळेस व्यक्त केला. या सत्कार प्रसंगी आई प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री.जीवन सावंत सर, श्री.बिबीषण धोत्रे सर त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील मनोहर गारडे, दिलीप गारडे, सुनील गारडे सर,भास्कर गारडे सर,व कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. ढवळ गाव हे पूर्वी पासून कुस्ती साठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र केसरी हा मानाचा 'किताब या गावाला मिळाला आहे. कुस्ती बरोबरच या गावाने आता स्पर्धा परीक्षेत नाव लौकिक मिळवला आहे हे वैभव गार्डे यांनी मिळवलेल्या यशामुळे ढवळ गावाला स्पर्धा परीक्षेची एक ओळख निर्माण झाली आहे. यापूर्वीही गारडे कुटुंबातील चि.अक्षय गारडे यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे व सध्या सहाय्यक गटविकास अधिकारीपदी त्याची निवड झाली आहे. त्यामुळे ढवळ गावासाठी आणि ग्रामीण भागासाठी गारडे कुटुंब हे एक आदर्श ठरलेले आहेत.गारडे कुटुंबातील या यशाबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले आहे.
