Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मोबाईल फोन चोरणा-या टोळीस फलटण शहर पोलीसांकडून अटक ३ लाख रुपयाचे १२ मोबाईल हस्तगत

 



फलटण चौफेर दि २३

फलटण शहर पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीस अटक केली केली आहे संशयित निलेश अनिल जाधव, वय २१ वर्षे,  निखील तुकाराम गदाई, वय १९ वर्षे व मंगेश संजय गंगावणे, वय २१ वर्षे, तिघे रा. सोमवार पेठ, फलटण यांना  अटक केली आहे याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार
दि.२१ रोजी डेक्कन चौक, फलटण येथे  युसुफ मन्सुर महात, वय ५२ वर्षे, रा. कोळकी, फलटण हे चालत जात असताना, तीन अनोळखी आरोपींनी दुचाकीवर येऊन, त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेऊन गेले. या अनुषंगाने फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोदविण्यात आला होता. यायबाबत फलटण शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या पथकाने  कौशल्यपूर्ण तपास करून तिघा संशयतांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ३ लाख २ हजार रुपये किमतीचे १२ मोबाईल व एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे  संशयतांना न्यायालयासमोर हजर केले असता  न्यायालयाने दि.२४  पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक  समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. नितीन शिंदे, स.पो.फौ. संतोष कदम, पो.ह. चद्रकांत धापते, सचिन जगताप, पोशि. सचिन पाटोळे, काकासो कर्णे, जितेंद्र टिके, स्वप्नील खराडे यांनी केली.
या अनुषंगाने सर्व नागरिकांना  मोबाईल फोन चोरीस गेल्यास किंवा हरविल्यास, त्याबाबत नजिकच्या पोलीस ठाण्यात तात्काळ माहिती द्यावी. अशा मोबाईल फोनचा शोध घेण्यास तांत्रिक सहाय्य देण्यासाठी भारत सरकारच्या संचार मंत्रालयांतर्गत असलेल्या दूरसंचार विभागाने https://www.ceir.gov.in ही वेबसाईट सुरु केली असून, त्याव्दारे हरविलेले किंवा चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधण्यासाठी उपयुक्त माहिती पोलीसांना दिली जाते. हरविलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईल फोन बाबतची तक्रार पोलीस ठाण्यास केल्यावर, त्यात असलेल्या मोबाईल फोन नंबरचे नवीन सिम कार्ड घ्यावे. त्यानंतर हरविलेल्या / चोरीस गेलेल्या मोबाईल फोन आणि तक्रारीची माहिती वरील वेबसाईट मध्ये असलेल्या Request for blocking lost/stolen mobile या शिर्षकाखाली असलेल्या नमुन्यात माहिती भरावी. सदर माहिती भरल्यावर, हरविलेला किंवा चोरीस गेलेला फोन जेंव्हा अॅक्टीवेट केला जातो, तेंव्हा त्याची माहिती संबंधीत पोलीस ठाण्यास दिली जाते व त्या मोबाईल फोन चा शोध लागतो. या संबंधाने अधिक माहिती हवी असल्यास किंवा काही शंका
असल्यास क्रमांक १४४२२ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन फलटण शहर पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.