फलटण चौफेर दि ८
फलटण तालुक्यातील ऊस वाहतूकदारांनी पुकारलेला संप श्रीराम व श्रीदत्त इंडिया कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर अखेर मिटला आहे फलटण तालुका ऊस वाहतूकदार संघटनेतर्फे वाहतुकी पोटी मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ होण्यासाठी दिनांक ७ रोजी वाहतूक बंद ठेवून संप पुकारण्यात आला होता . याबाबत वाहतूकदार संघटनेचे कार्यकर्ते व श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन नितीन शाहुराजे भोसले व श्री दत्त इंडिया साखर कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीने वाहतूकदारांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये १५ टक्क्याची वाढ देण्याचे मान्य केले असून त्यापैकी १२ टक्के वाढीची रक्कम दि ८ फेब्रुवारी रोजी वाहतूकदारांच्या खात्यावर जमा करण्याच्या व उर्वरित ३ टक्के रक्कम पुढील पंधरवड्यात देण्याच्या आश्वासनानंतर वाहतूकदारांनी पुकारलेला हा संप मिटला असल्याचे वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले