विडणी (योगेश निकाळजे) - विडणी येथे माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
विडणी येथील न्यू संघमित्र सांस्कृतिक तरुण मंडळाच्यावतीने माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांची १२६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, जयंतीनिमित्ताने सकाळी तक्षशिला बुद्धविहारात सामुदायिक बुद्धवंदनेचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माता रमाई यांच्या प्रतिमेस मानवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक तानाजी जगताप यांचा माता रमाई यांच्या जीवनावरील व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी उपासक उपासिका उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष कैलास जगताप यांनी केले, सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमास डॉ.सौ.सुचिता शेंडे ,डॉ.सौ.विजयामाला शेंडे,प्रियांका जगताप तसेच गावातील विविध बचतगटातील महिला व बौध्दनगरमधील उपासिका उपस्थित होत्या.
सायंकाळी ७ वाजता माता रमाई व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची गावातून आतिषबाजी व डिजेच्या निनादात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये बौध्दनगरमधील उपासक उपासिका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.