फलटण चौफेर दि १६ : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेला रुग्णसेविकांचा स्टाफ, वॉर्डबॉय तसेच इतर कर्मचारी बेजबाबदारपणे काम करत असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना व्यवस्थित वागणुक दिली जात नसल्याने अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करुन त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष हरीश काकडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. सदरचे निवेदन वैद्यकीय अधिकरी उपजिल्हा रुग्णालय यांना नुकतेच देण्यात आले.
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, रुग्णालयातील रुग्णसेविका गिरमे यांच्या कडून वृध्द महिला- पुरुषांना एकेरी व अरेरावीची भाषा वापरुन अपमानित केले जात असलेचे पहावयास मिळत, तसेच त्या रुग्णांची सेवा देण्यास असमर्थता दाखवत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण अर्धवट उपचार घेऊन घरी जात आहेत. या सर्व कारणामुळे रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे.
उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील लेबोरेटरी मध्ये दुर्लक्ष केल्यामुळे एका रुग्णांची लेबल दुसऱ्यास रुग्णाला लावल्यामुळे तपासणी हानिकारक होत आहे. ज्या रुग्णांना जो आजार झालेलाच नाही अशा रुग्णांना गंभीर आजाराची लागण झालेली असे तपासणी रिपोर्ट येत आहे असल्यामुळे ही ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर एखादया जनावरांना किंवा गुन्हेगारांना क्रूरतेची वागणुक दिली जाते त्या पध्दतीची वागणुक या ठिकाणी रुग्णसेविका (नर्सेस) देत आहेत तर रुग्णालयात स्वच्छता कोणत्याही पध्दतीची दिसत नसुन सर्वत्र घाणीचे साम्राज्य झालेचे निवेदनात म्हटले आहे. प्रसाधन गृहात स्वच्छता नाही, पाण्याची व्यवस्था नाही. त्याचबरोबर चांगल्या प्रतीचे जेवण वेळेवर मिळावे, बेडवर दैनंदिन बेडसिट स्वच्छता नसून ग्रामीण भागातील व शहरातील व तालुक्याच्या बाहेरील रुग्णांना आदराची वागणूक दिली जात नाही. बाहेरील औषधे लिहुन न देता रुग्णालयातच औषधे उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
अस्थिरोगतज्ञ (हाडांचे डॉक्टर) या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात यावे तर दिवस व रात्रपाळीसाठी वेळेत डॉक्टर उपस्थित असावेत. बेजबाबदार नर्सेस वॉर्ड बॉय व स्टाफ हे रुग्णांकडे लक्ष न देता ग्रुप ग्रुपने टवाळके करत, चेष्टा, मस्करी करत, मोबाईल चाळत बसलेले असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. अशा बेजबाबदार नर्सेस वर तातडीने निलंबनाची कारवाई करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सामाजिक न्यायच्यावतीने व्रीव आंदोलन छेडले जाईल याची गांर्भीयाने दखल घ्यावी असे शेवटी निवेदनात म्हटले आहे.