Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सातारा जिल्हा नियोजन समितीवर १४ सदस्य नामनिर्देशित

 


सातारा दि.१६ (जिमाका) :उत्पादन शुल्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शिफारसी नुसार सातारा जिल्हा नियोजन समितीवर १४ सदस्य  नामनिर्देशित करण्यात आले आहेत. यामध्ये विधीमंडळ/संसद सदस्यांमधून नामनिर्देशनाच्या २ सदस्यांची, जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले ४ नामनिर्देशित सदस्य तसेच सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या व जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या ८ व्यक्तींचे "विशेष निमंत्रित" म्हणून सातारा जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशन करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित करण्यात आलेले सदस्य पुढीलप्रमाणे- विधानमंडळ किंवा संसद सदस्यांमधून नियुक्त नामनिर्देशित सदस्य - महेश शिंदे, विधानसभा सदस्य,कोरेगाव मतदारसंघ,  जयकुमार गोरे विधानसभा सदस्य, माण-खटाव मतदारसंघ.  जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्य-प्रदीप अशोकराव साळुंखे -किवळ ता.कराड, राजेंद्र आत्माराम यादव- कराड, प्रदीप माने-शिरवळ ता. खंडाळा, धैर्यशील ज्ञानदेव कदम- पुसेसावळी ता.खटाव, राहुल प्रकाश बर्गे-कोरेगाव, संतोष जाधव-जळगाव ता.कोरेगाव, अभयसिंह उदयसिंह घाडगे-बुध ता.खटाव, जयवंत देवजी शेलार-कोयनानगर ता.पाटण, चंद्रकांत बाळासो जाधव-तासगाव, वासुदेव हनमंत माने-रहिमतपूर ता.कोरेगाव, पुरुषोत्तम बाजीराव जाधव-अतिट ता.खंडाळा, रणजित नानासो भोसले-सातारा
सातारा जिल्हा नियोजन समितीवर वरील नमूद नामनिर्देशित सदस्य तसेच विशेष निमंत्रितांचे करण्यात आलेले नामनिर्देशन पुढील आदेश होईपर्यंत किंवा शासनाकडून सदर नामनिर्देशन रद्द होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल, तोपर्यंत अबाधित राहतील. सदरच्या नामनिर्देशनासाठी उत्पादन शुल्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांचे विशेष योगदान लाभले आहे.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०२१५१०४४३१४९१६ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन निर्गमित करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.