फलटण चौफेर दि १५ साखरवाडी विद्यालय ता फलटण येथे इयत्ता ८ वी व ९वी मधील विद्यार्थ्यांसाठी संस्कार वर्गाच्या व्याख्यानाचे
स्वयंभूदत्त सेवा मंडळ. ५ सर्कल खामगाव येशील प. पू. महंत उमेशानंद सरस्वती महाराज यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरु श्री प्रिया मालवणकर प्रसिद्ध ज्योतीशास्त्री वास्तूतज्ञ मुंबई यांचे मुलांना संस्कारक्षम मार्गदर्शन लाभले रामायण, महाभारतातील गुरु-शिष्य परंपरेतील गोष्टी महाभारतातील गुरूंनी दिलेले संस्कार याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. भक्त प्रल्हाद, द्रोणाचार्य एकलव्य यांच्या कथा सांगून आईवडील. शिक्षकांचा आदर करावा हे त्यांनी व्याख्यानातून मुलांना सांगितले.
यावेळी प्रशालयेच्या पर्यवेक्षक तुळशीदास बागडे यांनी गुरु श्री. प्रिया मालवणकर आणि स्वयंभू दत्तसेवा मंडळ ५ सर्कलचे पं. पू महंत उमेशानंद सरस्वती महाराज यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी प्रशालयाच्या मुख्याध्यापिका उर्मिला जगदाळे मॅडम, दत्त परिवारातील दत्त भक्त लालू डांगे, सर्व शिक्षक,शिक्षिका,कर्मचारी उपस्थित होते आभार लांडगे सर यांनी मानले