विडणी (योगेश निकाळजे ) - विडणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती उत्साहात साजरी करण्यात आली.विडणी येथील संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने उत्तरेश्वर मंदिरात मुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव धीरज अभंग यांच्याहस्ते छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे, विडणी शाखाध्यक्ष राहूल शिर्के ,ग्रामपंचायत सदस्य सचिन अभंग , श्रीनिवास पवार ,अशोक अभंग , किसनराव टिळेकर , सुभाष कदम, किशोर जगताप ,दत्ता निकम , सचिन पवार,पंकज शिंदे,अजित भोसले, सुबोध शिर्के ,अक्षय अभंग ,दिनेश अभंग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.