फलटण चौफेर दि १९फलटण तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाणवू लागल्याने पशुपालक यांनी जास्तीत जास्त चारा पिकांची लागवड करून पशुधनाचे संगोपन करावे आणि दूध उत्पादनातील सातत्यता टिकवून ठेवावी. असे आवाहन डॉ संतोष पंचपोर, प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन पुणे विभाग पुणे यांनी केले.
दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये प्राप्त झालेले सुधारित मका बियाणे पशुपालक यांना वाटप प्रसंगी ते बोलत होते. प्राप्त झालेले बियाणे पशुपालक यांना तालुक्यातील पशुवैद्यकीय संस्था मार्फत वाटप होणार असून पशुपालक ज्यांचेकडे पाण्याची सोय उपलब्ध असेल त्या ठिकाणी बियाण्यांचे वाटप करून पशुपालक यांना चारा पिके घेण्याबाबत प्रोत्साहित करणे बाबत सुचना देणेत आल्या. तसेच पशुपालक यांनी विविध चारा पिकांची लागवड करून पशुधन टिकवून दूध उत्पादनातील सातत्य ठेवावे
मूरघास निर्मितीसाठी पशुपालक यांनी पुढाकार घेवून वर्ष भरासाठी नियोजन केल्यास चारा टंचाई वर मात करता येईल. धरण साठ्यातील उपलब्ध होणारे पाण्याचे योग्य नियोजन आणि वापर चारा पिकांसाठी करणेत यावा. असे आवाहन करण्यात आले. सदर बियाणे वाटप प्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. पवार, डॉ. भोसले, पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती फलटण डॉ. फाळके उपस्थित होते.