Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खासदारांनी खोट्या सह्या करून ट्रस्टची जमीन ताब्यात घेतली-श्रीमंत रामराजे फलटण पेक्षा सोलापूर मध्ये त्यांना ७ पट अधिक विरोध

 


फलटण चौफेर दि १९

नाईकबोमवाडी देवस्थान ट्रस्टची जमीन खासदारांनी व त्यांच्या कोळकीतील कार्यकर्त्याने खोट्या सह्या करून ताब्यात घेतली असून ट्रस्ट ही तुमच्या गावची अस्मिता आहे  या ट्रस्टला जमीन  श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांनी दिल्या मात्र या ट्रस्टची जमीन खासदारांनी खोट्या सह्या करून बळकावली असल्याचा घणाघात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर केला नाईकबोमवाडी ता फलटण येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी फलटण कोरेगाव चे आमदार दीपकराव चव्हाण, सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सरपंच छाया कारंडे, उपसरपंच अश्विनी चव्हाण, ज्येष्ठ नेते शामराव चव्हाण, माणिकराव सोनवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती


रामराजे पुढे म्हणाले, माझ्या  आजोबांच्या काळात संस्थान विलीन होताना संस्थानाचे नावे सुमारे ३७ हजार एकर जमीन होती मात्र ती कुळाची होती त्यामुळे त्यातील एकही एकर जमीन आम्ही परत घेतली नाही मात्र खासदारांकडे पहिली जमीन किती होती व आता  कुठपर्यंत गेली आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून विद्यमान खासदारांना मागच्या दीड वर्षांपूर्वी नीरा देवघर, भाटघर, धोमबलकवडी ही धरण सुद्धा माहीत नव्हती मात्र निवडणूक लागल्याने यांनी आता उचल खालली असून मी हे केलं मी ते केलं असा खोटं श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे त्यांनी सांगितलं मी एमआयडीसी आणली मात्र १९९६ साली मी सुरवडी,नांदल,ढवळेवाडी येथे एमआयडीसी आणली माझ्या एका शब्दावर लोकांनी त्यावेळी जमिनी दिल्या सुरवडी, खंडाळा, शिरवळ या ठिकाणीच्या भूसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया मीच पार पाडली सुरवडी येथील कमिन्स कंपनी मुळे आज या ठिकाणी आपल्या भागातील ६ हजार मुलांना रोजगार मिळाला आहे हे सर्व मी का केले तर फक्त शेतीवर अवलंबून राहिल्याने भविष्यात मुलांचे शिक्षण होणार नाहीत शिक्षण झाले नाहीत तर त्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत यामुळे यामुळे शेतकरी कर्जातून कधीच बाहेर येणार नाहीत त्यामुळे शेती व निसर्गावर अवलंबून न राहता शेती व व्यवसाय शेती व नोकरी असा आर्थिक विकास साधण्याचा मी मागील ३० वर्षापासू प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले



 आमदार दीपकराव चव्हाण म्हणाले, तालुक्याची मागील ३०  वर्षांपूर्वीची परिस्थिती व सध्याची परिस्थिती याच्यात अमुलाग्र बदल फक्त श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच दिसून येत असून आज नाईकबोमवाडी सारख्या गावामध्ये सुमारे एक कोटीची विकास कामे श्रीमंत रामराजे व श्रीमंत संजीवराजेंच्या अभ्यासातून व काम करून दाखवण्याच्या मानसिकतेतून होत असून व दीड वर्षांपूर्वी आपण सत्तेत नसल्याने आपल्या संपूर्ण तालुक्यातील २३५ कोटीच्या कामाला स्थगिती आणली होती मात्र आता आपण पुन्हा एकदा सत्तेत असून या विकास कामांमध्ये कोणतीही कमतरता पडणार नसून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्ते व विकास कामांचा विचार करूनच अजित पवार गटात जाण्याचा निश्चय केला असल्याचे  सांगितले


संजीवराजे म्हणाले, महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी १९९६ साली  जर  श्रीमंत रामराजेंनी अडवलं नसतं तर त्या पाण्यावरचा महाराष्ट्राचा हक्क जाऊन ते पाणी कर्नाटक व आंध्र प्रदेशला मिळाला असतं त्यामुळे कृष्णा खोऱ्याचं    सुमारे ९५ ते ९६ टीएमसी पाणी रामराजेंमुळेच आपणाला वाचवत व अडवता आलं आहे हे पाणी फक्त फलटणच नव्हे तर माण, सांगोला व माढा या तालुक्यांना सुद्धा मिळाल आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये  उसाचे क्षेत्र एवढ्या मोठ्या  प्रमाणावर वाढले आहे यावर जर आता कोणी येऊन म्हणत असेल की ते पाणी आम्ही अडवलं, आम्ही आणलं तर त्या फक्त आयत्या पिठावर रेघोट्या आहेत असंच म्हणावे लागेल  नाईकबोमवाडी गावाला धोम बलकवडीतून पाणी मिळावं यासाठी श्रीमंत रामराजेंच्या माध्यमातून आठच दिवसात याच्यावर योग्य तोडगा काढू असा शब्दही त्यांनी यावेळी दिला कार्यक्रमाला नाईकबोमवाडीसह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.