फलटण चौफेर दि २०सुरवडी ता फलटण येथील जगताप वस्ती ते ५ सर्कल(खामगाव) या बहुप्रतिक्षित रस्त्याचे काम उद्या पासून सुरू होणार असल्याची माहिती सुरवडीच्या सरपंच शरयू साळुंखे पाटील यांनी दिली.सुरवडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून या रस्त्याचे मागील काळात दोन ते तीन वेळा खडीकरण झाले होते मात्र रस्त्याची सद्यस्थितीत अतिशय बिकट अवस्था झाली होती त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या पवारमळा, घारगेमळा, माळीमळा, जगताप मळा येथील रहिवाशांनी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्याकडे या रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत वारंवार पाठपुरावा केला होता आता या रस्त्याचे निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्षात रस्त्याचे उद्यापासून काम सुरू होणार असल्याचे सरपंच शरयू साळुंखे पाटील यांनी सांगितले