फलटण चौफेर दि १९
पुसेगाव ता खटाव येथे डिसेंबर २०२१ मध्ये मजुर राजू चंद्रबली पटेल वय ३२ वर्षे व्यवसाय गवंडीकाम मूळ रा. चंद्रबली, सिरजमदेई, देवारिया, उत्तरप्रदेश याचा कंत्राटदार मेवालाल चौहान व इतर साथीदारांनी पैशाच्या वादातून मारहाण करून खुन केला होता व येरळा नदीपात्रात त्याचे प्रेत गाडून मुख्य आरोपी मेवालाल चौहान व इतर आरोपी हे गुन्हा करून फरार झालेले होते.
त्याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. त्यावेळी इतर ३ आरोपी पकडण्यात पुसेगाव पोलीस ठाणेस यश आलेले होते. मुख्य आरोपी व इतर आरोपी मिळून न आलेने मागील दोन वर्षापासून त्यांचे तपासकामी पोलीस तपासपथकवेळोवेळी परराज्यात जावून शोध घेवूनही आरोपी मिळून येत नव्हते.
तपास पथकाकडून तांत्रिक व गोपनीय माहीतीच्या आधारे मागील दोन वर्षापासून चालू असलेल्या तपासाला अखेर यश प्राप्त होवून मुख्य आरोपी नामे मेवालाल जवाहर चौहान रा. बिहार हा शिवान जिल्हयात असलेची माहीती प्राप्त होताच पुसेगाव येथून तपासपथकाने बिहार राज्यात जावून तेथे सापळा रचला, सिताफिने आरोपीचा शोध घेवून त्याचेकडे कौशल्यपूर्ण सखोल चौक्तशी करून त्यास अटक केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि. संदीप शितोळे च आशिष कांषले हे करीत आहेत.
समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, राजेंद्र शेळके, उपविभागिय पोलीस अधिकारी, कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. आशिष काबळे, रा पो नि संदीप शितोळे (कोयनानगर पोलीस ठाणे), पोलीस हवालदार लैलेश फडतरे (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस नाईक सुनिल अब्दागिरे, अशोक सरक, प्रमोद कदम, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश घाडगे यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक व श्रीमती आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, श्री राजेंद्र शेळके, उपविभागिय पोलीस अधिकारी, कोरेगाव यांनी अभिनंदन केले