फलटण चौफेर दि १८ नीरा देवघर कालवा प्रकल्पाअंतर्गत सुरवडी कालवा किमी ० ते ३० याकालव्याच्या शुभारंभ व भूमिपूजनाचा कार्यक्रम सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील व माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत उद्या दिनांक १९ रोजी सकाळी १० वाजता सुरवडी गावठाण ता फलटण येथे होणार असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंखे पाटील यांनी दिली