Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लोणंद रेल्वे ओव्हर ब्रीजचे काम लागणार मार्गी




फलटण चौफेर दि १८ लोणंद ता खंडाळा येथील रेल्वे ओव्हर ब्रीजसाठी ६५ कोटींच्या अंदाजपत्रकास केंद्राच्या सेतू बंधन योजनेंतर्गत खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मिळाली आहे   त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम आता मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


लोणंद येथील सईबाई हौसिंग सोसायटी येथे रेल्वे उड्डाणपूल व्हावा यासाठी परिसरातील नागरिक अनेक दिवसांपासून मागणी करत होते. तसेच त्यांनी यासाठी आंदोलने देखील केली होती. दरम्यान संबंधित नागरिकांनी खासदार पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन खा. श्रीनिवास पाटील यांनी रेल्वे मंत्रालय आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाशी वेळोवेळी संपर्क साधून पाठपुरावा केला होता.याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून तसेच लोकसभेत अति महत्त्वाच्या प्रश्नोत्तराच्या काळात हा मुद्दा उपस्थित करून सदर रेल्वे उड्डाणपूलाच्या मागणीसाठी आग्रही राहिले होते.



खा. श्रीनिवास पाटील यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नाला अखेर यश आले असून त्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने सीआरआयएफ फंडमधून सेतुबंधन योजनेअंतर्गत एलसी गेट नंबर ४० सईबाई हाउसिंग सोसायटी येथे ६५ कोटीच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली आहे. त्याबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांनी मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. तर सदरचे कामाला लवकर प्रारंभ व्हावा यासाठी संबंधित महारेलच्या अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या आहेत. दरम्यान खा. पाटील यानी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळे मागील अनेक दिवसापासून मागणी होत असलेल्या रेल्वे क्रॉसिंग वरील उड्डाणपूलांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे लोणंद येथील नागरिकांन, रेल्वे प्रवासी संघटना यांनी खा. पाटील यांचे आभार मानले आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.