विडणी (योगेश निकाळजे ) - मोगराळे घाटात रात्री मळीचा टँकर पलटी होऊन तीन जर्शी गायींचा जागीच मृत्यु झाला असून टॅकर चालक गंभीर जखमी झाला आहे.
फलटण - दहिवडी मार्गावरील मोगराळे घाटात सांगोलावरुन फलटणच्या दिशेने मळी घेऊन निघालेला टॅकर (क्रं. एम एच-०९-सी यु-८४५५) रात्री २ वाजण्याच्या सुमारास घाटातील शेवटच्या वळणाचा अंदाज न आल्याने टँकर पलटी होऊन यामध्ये सुरेश ज्ञानदेव मदने (रा.दुधेबावी,ता.फलटण) यांच्या मालकीच्या सुमारे अडीच लाख रुपये किंमतीच्या तीन दुभत्या जर्शी गाई टँकरखाली सापडून जागीच ठार झाल्या आहे तर टँकर चालक दिपक दिलीप शिंदे (रा.बलवडी ता.सांगोला,जि. सोलापूर ) हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हा अपघात ज्याठिकाणी झाला ते घाटाचे शेवटचे वळण आहे याठिकाणीच दुधेबावी हद्दीतील मदनेवस्ती असून याठिकाणी अनेक घरे आहेत मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही मानव जीवितहानी झाली नाही,या अपघाताची फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे '