फलटण चौफेर दि २
फलटण तालुक्यात तसेच महाराष्ट्रात मराठा आंदोलक व मराठा क्रांती मोर्च्या यांच्या वतीने विविध आंदोलनात तसेच मराठा आंदोलन सभांमधून ओबीसींचे जेष्ठ नेते व मंत्री छगनराव भुजबळ यांच्या नावाचा वापर करून वाजवले जाणारे गाणे ओबीसींच्या भावना दुखवणारे असून यामुळे सामाजिक तेढ वाढत आहे या गाण्याचा वापर सार्वजनिक ठिकाणी केला जात असून यामुळे ओबीसी समाज तीव्र नाराज आहे या पुढे हे गाणे वाजवल्यास तो डी जे पेटवून देऊ व होणाऱ्या उद्रेकास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल आशा आक्रमक भावना ओबीसी तरुणांनी आमदार दिपकराव चव्हाण यांच्या समोर मांडल्या
या वेळी आमदार दीपक चव्हाण यांनी दोन्ही बाजूने शांतता व सौहार्द राखावा फलटण हे नेहमीच एकमेकांचा आदर करणारे शहर आहे त्यामुळे अशा प्रकारचे गाणे अथवा इतर गोष्टी ज्या मुळे शांतता भंग होईल अशा गोष्टी कोणीही करू नयेत असे आवाहन केले
ओबीसी संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की या पुढे या गाण्याला फलटण तालुका तसेच संपूर्ण महाराष्ट्रात कायमची बंदी घालावी त्याच बरोबर हे गाणे वाजवणार्या डी जे वर कडक कारवाही करावी जर हे गाणे या पुढे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाजले तर ओबीसी बांधवांच्या उद्रेकास प्रशासन जबाबदार राहील तरी त्वरित या गाण्यास बंदी घालण्यात यावी