Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सरदार वल्लभ भाई हायस्कूलच्या वैष्णवी व ज्ञानदा राष्ट्रीय खेळाडूंचा श्रीमंत रामराजेंच्या हस्ते सन्मान

 



फलटण चौफेर दि २

रांची(झारखंड) येथे स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया द्वारा आयोजित झारखंड सरकार व रांची क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २३ ते २८ जानेवारी दरम्यान  ६७ वी शालेय राष्ट्रीय वुशू क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्यांमधून अनेक खेळाडू  सक्रिय सहभागी झाले होते


 महाराष्ट्र शासनाच्या वतीने  १७ वर्ष व १९ वर्षे खालील एकूण ४० खेळाडूंचा संघ सहभागी झाला होता. यामध्ये फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित सरदार वल्लभभाई हायस्कूल व जुनिअर कॉलेज साखरवाडी चे श्रीमंत व्यंकटेश महाराज कुस्ती केंद्र - साखरवाडी च्या वतीने वैष्णवी तुषार मोहिते - हिने ५६ किलो खालील वजन गटांमध्ये - कांस्यपदक व ज्ञानदा मोहन शिंदे- हिने ६५ किलो खालील वजन गटांमध्ये- कांस्यपदक मिळवून प्रशालीचे व संस्थेचे नाव राष्ट्रीय स्पर्धेमध्ये गाजविले. या स्पर्धेचे १७ वर्षाखालील मुले व मुली यांची उपविजेते पदाची ट्रॉफी आणि जनरल चॅम्पियनशिप उपविजेतेपदाची ट्रॉफी महाराष्ट्राने जिंकून नेहमीप्रमाणेच क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचा दब- दबा ठेवला. 


या संपूर्ण स्पर्धेमध्ये जय श्रीराम , छत्रपती शिवाजी महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणांचा जयघोष महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांनी सुद्धा देऊन या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेतील साखरवाडी पंचक्रोशीतील यशस्वी खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक  तुषार मोहिते - सर यांचा लक्ष्मी विलास या निवासस्थानी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सन्मान करून भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी डी के पवार माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक महानंदा डेअरी मुंबई, सतीश माने अध्यक्ष सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, शंकरराव माडकर माजी सभापती पंचायत समिती फलटण,सौ लतिका अनपट -माजी सभापती पंचायत समिती फलटण,विजय अनपट उद्योजक -सातारा, रेशमा ताई भोसले माजी सभापती पंचायत समिती फलटण,किसन झेंडे माजी चेअरमन होळ विकास सोसायटी,रावसो वैद्य- मा.सरपंच खामगाव, तुकाराम पवार सदस्य ग्रामपंचायत साखरवाडी,मातोश्री कन्ट्रक्शनचे संजय भोसले, बाळासाहेब भोसले विस्तार अधिकारी पंचायत समिती फलटण, रवींद्र टिळेकर सर माजी सरपंच खराडेवाडी,नेताजी साळवे, शरद जाधव सामाजिक कार्यकर्ते,शंभुराजे सरगर उद्योजक,दत्तात्रय वाघ ग्रामपंचायत सदस्य साखरवाडी,योगेश माडकर युवा उद्योजक,ओंकार मोहिते यांची उपस्थिती होती



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.