फलटण चौफेर दि २
राजकारणासाठी विरोधाला विरोध करून फलटण तालुक्यात होणारा विकास न पाहहून वैयक्तिक जळफलाटा पोटी ईतर तालुक्यातील गाव कुसाबाहेर टाकलेल्या पुढाऱ्यांना बोलावून केलेला विरोध आहे
फलटण तालुक्यातील जनतेने आता ओळखलं पाहिजे फलटण चा जलद गतीने होणारा विकास व आपली वर्षाची नाकरती राजवट तालुक्यातील तरुण पिढीला दिसत आहे त्या मुळे फलटण तालुकाच काय संपूर्ण माढा मतदार संघ आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पाठीशी उभा आहे फलटण तालुक्याचे जनतेने विचार करण्याची गरज आहे तरुण पिढीला राजकारणापेक्षा रोजगार महत्वाचा आहे विकास महत्वाचा आहे म्हणून पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर च निवडून येणे गरजेचे आहे
फलटण तालुक्यातील पुढाऱ्यांनी सुद्धा अपशकुनी राजकीय खेळ्या करून तालुका भकास करू नये कारण या आधीही दोन वेळा लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे बाबत असाच राजकीय कुट नीतीचा वापर केलेला फलटण तालुका विसरलेला नाही.
तूर्तास महायुतीतील घटक पक्ष असल्यामुळे टोकाची टीका टिपण्णी न करता वरिष्ठ नेत्यांवर सोपवून एवढेच म्हणेन
पक्षाला जागा मागणे किंवा तिकीट मागणे काहीही गैर नाही तो लोकशाहीचा भाग आहे परंतु अंतिम निर्णयानंतर माशी शिंकली तर तालुका माफ करणार नाही