फलटण चौफेर दि ८
पिंपरद ता फलटण गावाच्या हद्दीत गांजाची विक्री करण्याकरीता आलेल्या तीन आरोपीना स्थानिक गुन्हे शाखा सातारा व फलटण ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून संशयित सुनील भांग्या पावरा वय २० रा रोहिणी ता शिरपूर जि धुळे ,उमेश भाईदास पावरा वय २२ रा बोराडी ता शिरपूर जि धुळ व राजेंद्र बबनराव कापसे वय ५५ रा निंबलक ता फलटण जि सातारा यांना अटक केले असून त्यांच्या ताब्यातून ६ लाख ४१ हजार रुपये किंमतीचा २५.६६० किलो ग्रॅम गांजा व ६३ हजार रुपये किमतीची मोटार सायकल व २ मोबाईल हॅन्डसेट जप्त केला आहे
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दि.७ रोजी त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, पिंपरद ता. फलटण जि.सातारा गावचे हड्डीतील गगणगिरी मंगल कार्यालयाचे समोर तीन इसम मोटार सायकल क्रमांक एम.एच.११ श्री.डक्यू ५२९८ बरुन अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्याकरीता येणार आहेत. त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रोहित फाणे यांना पथकासह नमुद ठिकाणी जावून प्राप्त माहितीमधील इसमांना ताब्यात घेवून त्याचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले. नमुद पथकाने प्राप्त माहितीचे ठिकाणी फलटण ग्रामिण पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सापळा लावून तीन इसमांना ताब्यात घेतले. नमुद इसमांच्या कब्जातून एकूण ६,४१,५००/- रुपये किमतीचा २५.६६० किलो ग्रॅम गांजा व ६३,०००/- रुपये किमतीची मोटार सायकल व मोचाईल हॅन्डसेट हस्तगत करुन त्यांचेविरुध्द फलटण ग्रामिण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, रविंद्र फाणें, विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांचळे, मंगेश महाडीक, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, सनी आवटे, मुनीर मुल्ला, राजू कांबळे, शिवाजी भिसे, अजित कर्णे, मनोज जाधव, अमित झेंडे, हसन तडवी, केतन शिंदे, धीरज महाडीक, अनिल खटावकर, अमोल निकम, दत्ता चव्हाण, अमृत कर्पे तसेच फलटण ग्रामिण पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार शांतीलाल ओंबासे, श्रीकांत खरात, सुरज काकडे, नितीन चतुरे यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले