सातारा दि.८ (जिमाका): शासनाने मुद्रांकशुल्क व दंड सवलत अभय योजना २०२३ दोन टप्यात जाहीर केली.पहिला टप्पा हा सन २००१ ते २०२० मधील नोंदणीकृत व अनोंदणीकृत निष्पादित झालेल्या व कमी मुद्रांक शुल्क दिलेल्या प्रकारांनासाठीचा कालावधी दि १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवार २०२४ पर्यंत होता. तथापि सदर कालावधीची मुदत शासनाने दि. २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वाढविली आहे.
पहिल्या टप्यात कमी भरलेल्या मुदांक शुल्काकरिता २५% व दंडा करिता ९०% सवलत आहे. दुसरा टप्पा हा सन २००१ ते २०२० मधील नोंदणीकृत व अनोंदणीकृत निष्पादित झालेल्या व कमी मुद्रांक शुल्क दिलेल्या प्रकरणांसाठी कालावधी दि १ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत आहे यामध्ये कमी भरलेल्या मुदांक शुल्काकरिता २० टक्के व दंडा करिता ८० टक्के सवलत आहे.
ठळक वैशिष्टये- सातारा जिल्हातील सन १९८० ते २००० या कालावधीतील १६३४ प्रकरणांमध्ये वसुली रुपये १ लाखाच्या आतील असल्याने अभय योजना २०२३ नुसार त्यामधील मुद्रांक शुल्क रुपये ४६,६३६,६८१/- इतकी रक्कम माफ करण्यात आलेली आहे. सदर कालावधीतील वरील अक्षेपित प्रकरणांमध्ये ७/१२पत्रकी बोजा नोंद असल्यास मूळ दस्तावर प्रमाणित करून बोजा कमी करून घेण्याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे. सन २००१ ते २०२० मधील १८९ प्रकरणामध्ये ४७ लाखांची वसुली झालेली आहे.
थकीत मुद्रांक शुल्काचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पक्षकारांच्या संबंधित नोंदणीकृत दस्तातील मिळकतीवर बोजा नोंद करण्यात येणार आहे
महाराष्ट्र मुद्रांक कायद्यातील कलम ४६ व ५९ प्रमाणे मालमत्ता जप्त करणे, बँक खाती गोठवीणे तथा पोलिस कार्यवाही करण्यात येणार आहे.