फलटण चौफेर दि २२
महिलांना घरच्या घरी स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी सुरवडी ता फलटण ( पवार- मळा) या ठिकाणी महिलांची कार्यशाळा घेण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत पवार यांनी केले या कार्यक्रमासाठी डि.आर .पी. योगिनी बोडरे या मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या त्यांनी प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, प्रक्रिया उद्योग या बद्दल माहिती दिली. उपस्थित महिलांच्या शंकांचे समाधान केले... तसेच सेंद्रिय शेती बद्दल व सेंद्रिय शेती गट निर्मिती बाबत कृषी सहाय्यक अरविंद नाळे यांनी मार्गदर्शन केले.. कार्यक्रमाला पुनम पवार, हेमलता पवार ,वर्षा पवार, रूपाली पवार, माधुरी पवार, मयुरी पवार, प्रियंका पवार, कोमल पवार ,कविता नलवडे, माधुरी पवार ,अश्विनी पवार, बेबी पवार इ. महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार माधुरी पवार यांनी केले