विडणी (योगेश निकाळजे) - विडणी येथे रात्री बिवट्याने कालवड फस्त केल्याची घटना घडली असून यामूळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
विडणीत काल बुधवार दि.२१रोजी रात्री ११.३० च्या सुमारास २४ फाटा(राऊतवस्ती) येथील संतोष रामचंद्र नाळे यांच्या गोठ्यातील चार महिन्यांची कालवड बिवट्याने ऊसात ओढत नेऊन फस्त केल्याची घटना घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच फलटणच्या नियत्रक्षेत्र वनअधिकारी सौ.सारिका लवांडे, राजेंद्र कुंभार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून घटनेच्या ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत,या बिबट्याने संतोष नाळे यांच्या गुरांच्या गोट्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत ही कालवड ओढून ऊसात नेवून टाकल्याचे आढळून आले आहे.
या घटनेमुळे विडणी परिसरात घबराट पसरली आहे फलटण तालुक्यात विडणी परिसर हा संपूर्ण बागायती क्षेत्र म्हणून ओळखला जातो येथील शेतकरीवर्ग रात्रंदिवस शेतामध्ये राबत असतो बिबट्याच्या या घटनेमुळे शेतकरी वर्गांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाऊ नये तसेच त्याचा पाठलागही करू नये , अंधारात मुलांना एकटे सोडू नये ,अंधारात किंवा रात्री शेतावर जाताना किंवा शेतामध्ये असताना मोठ्याने गाणी म्हणावी अथवा मोबाईलचा मोठा आवाज वाढवून गाणी लावावीत, गाव स्वच्छ ठेवल्यास घाणीमुळे येणारी मोकाट कुत्री व डूकरांची संख्या कमी होईल व पर्यायाने भक्षाच्या शोधात येणारा बिबट्या हा गावात येणार नाही, बिबट्याला पुरेसे खाद्य व राहण्यायोग्य वातावरण मिळाले तर बिबट्या गावाजवळ राहू शकतो ,पाळीव कुत्रे बकऱ्या व डुकरे बिबट्याला वस्तीकडे आकर्षित करतात , शेतकऱ्यांनी स्वतःचे नुकसान कमी करण्यासाठी आपल्या गुरांना बंदिस्त गोठ्यामध्ये ठेवणे आवश्यक आहे अशा गोष्टी नागरिकांनी कराव्यात असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.