फलटण चौफेर दि २१
गिरवी, ता. फलटण, जि. सातारा येथे शिवगर्जना मित्र मंडळ, यांच्या वतीने पारंपारिकरित्या शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवगर्जना मित्र मंडळ गेली १५ वर्षे यशस्वीरीत्या शिवजयंती उत्सव पार पाडत आहे मंडळाचे हे १६ वर्ष असून दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ठीक ८ वाजता पारंपारिक वाद्यांच्या गजरात व सर्व ग्रामस्थ, महिला व मंडळाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता फलटण पंचक्रोशीमध्ये प्रथमच पुणे येथील नामांकित नादब्रह्म ट्रस्ट ढोलताशा ध्वज पथक यांचे उत्कृष्ट असे वादन आयोजित करण्यात आले होते नयनरम्य फटाक्यांची आतिषबाजी, विद्युत रोषणाई, आकर्षक मुर्ती सजावट अशा विविध कार्यक्रमासह भव्य पारंपारिक मिरवणुक पार पडली. त्याप्रसंगी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि गिरवी पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी, गिरवी व गिरवी पंचक्रोशीतील महिला भगिनी, यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता