Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शनिवारी फलटणमध्ये रास्ता रोको

 


फलटण चौफेर दि २२ - मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार 24 फेब्रुवारी रोजी फलटण तालुक्यातील प्रत्त्येक गावागावात व प्रमुख मार्गावर रास्ता रोको आंदोलन होणार असून या आंदोलनाला कोणतेही गालबोट न लावता तसेच सध्या दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून कोणत्याही मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी सर्व मराठा बांधवानी घ्यावी, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा फलटण ने केले आहे.


      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य सरकारने मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना सगेसोयरे आदेशाची अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन दिलं होतं,तसेच कायदेशीर व पन्नास टक्के च्या आतील ओबीसी प्रवर्गातील आरक्षण द्यावे अशी मागणी केली होती, परंतु पन्नास टक्के च्या वरील आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा समाज किंवा क्रांतिसूर्य मनोज दादा जरांगे पाटील यांनी केलेलीच नाही, व ते पन्नास टक्के च्या वरील आरक्षण हे सुप्रीम कोर्टात टिकणारे नसून ते देत एक प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार हे चालढकल करीत असल्याचे निषेधार्थ शनिवार दि.24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 व संध्याकाळी 4 ते 7 या वेळी प्रत्तेक प्रमुख गावात तसेच मुख्य रस्त्यावर हे रास्ता रोको आंदोलन सनदशीर मार्गाने होणार असून या आंदोलनाला कोणीही हिंसक करू नये किंवा करू देऊ नये तसेच या रास्ता रोकोला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास त्या लोकांची माहिती मराठा क्रांती मोर्चा फलटण व स्थानिक पोलीस ठाण्यात किंवा पोलीस अधिकारी,ठाणे अंमलदार,किंवा बिट अंमलदार,गाव पोलीस पाटील यांना माहिती द्यावी  असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा फलटण ने केली आहे.


      या ठिकाणी होणार रास्ता रोको .....


 आसू रोड येथील राजाळे येथे,पंढरपूर रोड वाजेगाव येथे, शिखर शिंगणापूर रोड सोनवडी बु,येथे,दहिवडी रोड झिरपवाडी येथे,पुसेगाव रोड वाठार निंबाळकर वाठार फाटा,सातारा रोड बीबी फाटा,लोणंद पुणे रोड बडेखान,तसेच पाडेगाव येथील पूल,बारामती रोड सांगवी,खुंटे येथील नवीन पूल,होळ येथे पूल,होणार आहे तरी तेथील आसपासच्या सकल मराठा बांधवानी त्या त्या ठिकाणी जाऊन सनदशीर मार्गाने सकाळी व संध्याकाळी रास्ता रोकोत सहभागी व्हावे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.