Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हे, ही दिवस जातील.....




मनुष्य जीवनात सुख दुःख हे आलेच, आपल्याला जीवनात सुखी व्हायचे असेल तर, प्रत्येक दिवस आनंदात घालवण्याचा निश्चय करा, व आजचा दिवस आपला आहे हे समजून त्याचा आनंद घ्या, यश अपयश, ही आलेच यशाने हुरळून जाऊ नका, व अपयशाने खचून जाऊ नका, भूतकाळात होऊन गेलेल्या काही वाईट अप्रिय प्रसंगाची आठवण काढून उगीच चिंताग्रस्त बनत असतात, खरे म्हणजे भूतकाळातील घटनांबद्दल शोक व चिंता करण्यात काहीही अर्थ नसतो, व या घटना घडवून गेलेले असतात, आता त्यावर काहीही उपाय उरलेले नसतात, म्हणून आपण अशा प्रकारे भूतकाळातील घटनांची चिंता करणे सोडून दिले पाहिजे.

आपल्यापैकी बरेच जण अशा प्रकारे भविष्यकाळाची चिंता करून वर्तमान काळ खराब करत असतात. पूजेवेळी देवांच्या पायावर वाहिलेली फुले, त्यांचे किती कौतुक किती भाग्य, पण दुसऱ्या दिवशी तीच फुले निर्माल्य होऊन जातात. तसेच आपला आयुष्य आहे, 

कालची सत्ता आज नाही, म्हणून शोक करण्यात अर्थ नाही, भूतकाळातील घटनांची चिंता करत बसू नये, तसेच पुढे काय होईल ? याचाही जास्त विचार करू नये आपला वर्तमान काळ अधिक महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्यावे, व तो आनंदाने जगण्यासाठी काय करायला हवे ! याचा विचार करावा. काल काय घडले आहे, व उद्या काय घडणार आहे, याची व्यर्थ चिंता न करता आजचा दिवस कसा आनंदात जाईल हे पाहणे महत्त्वाचे.

 जीवनात सुख दुःख आलेच, आपल्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून कार्यरत रहा, सुखाचे क्षण आल्याशिवाय राहत नाहीत


शब्दांकन 

श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी ता. फलटण. जि. सातारा फो.९९७०७४९१७७

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.