फलटण चौफेर दि २१ शरयु फौंडेशन व शरयु साखर कारखान्याच्या वतीने जलसंधारण पाणलोट व रस्ते विकासाची भरीव कामे करून परिसराचा कायापालट करणार असल्याचे प्रतिपादन शरयु शुगरचे कार्यकारी संचालक युगेंद्र दादा पवार यांनी केले आहे.
बिबी येथे फौंडेशनने ओढा खोलीकरण कामासाठी मोफत पोकलेन मशीन उपलब्द करून दिले असून सदर कामाची पाहणी करण्यासाठी आज बिबी येथे त्यांनी भेट दिली.
शरयुच्या माध्यमातूम याआधी विध्यार्थ्यांची गैरसोय ओळखून माध्यमिक शाळेसाठी सहा नवीन वर्ग खोल्या बांधून देण्यात आल्या असून सुरक्षेसाठी सी सी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, घाडगेवाडी ग्रामपंचायतीस जलजीवन योजनेसाठी पिण्याच्या पाण्याच्या विहरीसाठी भरीव मदत करण्यात आली असून तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे.
परिसराचा शास्वत विकास आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती यासाठी शरयु कायम प्रयत्नशील राहणार असून जलसंधरण पाणलोट विकास शेती सुधारणा ऊस विकास रस्ते दुरुस्ती व सुधारणा आदी कामे प्राधान्याने हाती घेतली जाणार आहेत.
शिवजयंतीचे औचित्य साधून प्रारंभी श्री युगेंद्र दादा पवार यांच्या शुभहस्ते शिव पुतळ्यास पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी बिबी ग्रामस्थांच्या वतीने श्री पवार यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सरपंच सौ रुपाली बोबडे, शरयुचे संचालक श्री अविनाश भापकर, ग्रामपंचायत सदस्या सौ प्रीती काशीद विकास सोसायटीचे चेअरमन बळवंत नलवडे नंदकुमार कुंभार लोकमतचे वार्ताहर सूर्यकांत निंबाळकर, संदीप काशीद, तुळशीदास बोबडे, डॉ बापू बोबडे, संजय बोबडे, अनिल बोबडे, आदेश बोबडे,अनिल गायकवाड, उदयसिंह बोबडे, लक्ष्मण बोबडे, विनोद बोबडे, प्रदीप बोबडे, जुबेर शेख, सुशील बोबडे, सिकंदर दीक्षित, वैभव कुंभार, विशाल पवार, आदींसह परिसरातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.