Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे सांगोला उपसा जलसिंचन योजनेस ८८४ कोटी रुपये मंजूर खा रणजीत सिंह नाईक निंबाळकर व आ शहाजी बापू पाटील यांच्या प्रयत्नांना यश

 


फलटण चौफेर दि ५

 सांगोला तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची असणारी बाळासाहेब ठाकरे सांगोला उपसा सिंचन योजनेस खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर व सांगोल्याचे आमदार शहाजी बापु पाटील यांच्या सतत च्या पाठपुराव्यामुळे आज राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुधारित प्रशासकीय मंजुरी देऊन ८८४ कोटी रुपये मंजुर केले


 सांगोला तालुका हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात आहे. . या भागातल्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे सातत्याने खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर आमदार शहाजी बापू पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे या भागातल्या दुष्काळी जनतेला खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. सन २०१९ च्या निवडणुकीमध्ये खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी जाहीर सभेमध्ये शब्द दिला होता की पुढची निवडणुक ही पाण्याच्या प्रश्नावर होणार नाही. त्यामुळे सातत्याने खासदार व आमदार शहाजी बापू पाटील हे प्रयत्न करत होते . आज दिवस  सांगोला तालुक्याच्या दृष्टीने सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा दिवस निर्माण झाला आहे. या योजनेमुळे हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. सांगोला तालुक्याला निरा देवधर, टेंभू योजना, आता बाळासाहेब ठाकरे सांगोल उपसा सिंचन या योजनेतून पाणी मिळणार आहे. त्यामुळे सांगोला तालुक्याचा दुष्काळी तालुका हा कलंक कायमस्वरूपी आता पुसला  जाणार आहे व या भागातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना युवकांना आता नोकरी आणि व्यवसायासाठी मुंबई आणि पुण्याला हेलपाटे घालावे लागणार नाहीत. आज तालुक्यामध्ये जनतेने फटाके वाजवून  आनंद उत्सव  साजरा करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर व आमदार शहाजी बापु पाटील तसेच केंद्र शासनाचे ही आभार मानले


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.