Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटणला फुले प्रेमी आक्रमक पुतळा इंचभर सुद्धा हलवणार नाही : महात्मा फुले जयंती उत्सव समिती

 


फलटण चौफेर दि ७

          महात्मा फुले जयंती उत्सव समिती व फलटण तालुक्यातील फुले प्रेमी यांनी आज फलटण नगरपरिषद  तहसीलदार कार्यालय व फलटण शहर पोलिस स्टेशन  मध्ये निवेदन देण्यात आले यावेळी पालिका अधिकारी तेजस पाटील ,फलटणचे तहसिलदार डॉ अभिजित जाधव व फलटण शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी निवेदन स्विकारले यावेळी हजारो फुलेंप्रेमी उपस्थित होते 


              महात्मा फुले यांचा पुतळा सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली एक इंच सुद्धा हलू देणार नाही हा पुतळा तमाम फुले प्रेमीच्या व बहुजन समाजाचे श्रद्धा स्थान आहे आणि पुतळा परिसर ही आमच्यासाठी क्रांतिभूमी आहे फलटण पालिकेने पुतळा मूर्ती जागेवरून हटवणे तसेच मूर्ती बदलणे या बाबत पालिकेत विशेष सभा घेऊन २६ एप्रिल २०२१ रोजी ठराव संमत केला आहे असे निवेदनात म्हणले आहे 


                काही राजकीय लोकांकडून समाजातील तीन चार लोकांना हाताशी धरून फलटण तालुक्यातील हजारो फुले प्रेमींच्या भावना विचारात न घेता पुतळ्याची जागा व मूर्ती बदलण्याचा घाट घातला आहे पूर्वी पासून असलेली क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची मूर्ती ही पूर्णपणे रेखीव व सुस्थितीत असून कारण नसताना मूर्ती व जागा बदलण्याचा घाट घातल्या मुळे फुले प्रेमींचा उद्रेक होऊ शकतो याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे जयंती उत्सव समितीने दिलेल्या निवेदनात म्हणले आहे .


ठराव रद्द करावा पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी व नवीन मूर्ती बसवण्यासाठी पालिकेने एप्रिल २०२१ रोजी केलेला ठराव व त्यास मागितलेली मुदतवाढ ही त्वरित रद्द करण्यात यावी अन्यथा पालिका प्रशासनाला फुले प्रेमीच्या उद्रेकास सामोरे जावे लागेल 


चिपको आंदोलन 

          फुले प्रेमींच्या भावना विचारातबन घेता पुतळा हलवण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही देखील शांततेच्या मार्गाने आंदोलन करू आम्ही क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याला मिठी मारून बसू आम्ही चिपको आंदोलन करू 

          गोविंद भुजबळ , 

    सदस्य , महात्मा फुले जयंती उत्सव समिती फलटण 


फलटण पालिकेला पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात येत आहे केलेला ठराव रद्द करावा या नंतर महात्मा फुले जयंती उत्सव समिती स्व खर्चाने सुशोभीकरण करण्याचे काम हातात घेईल 

              रणजितदादा भुजबळ 

       समाजिक कार्यकर्ते व फुले प्रेमी 

          

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.