Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राजुरीत यात्रेतील कुस्त्यांच्या भांडणातून दोन गटात मारामारी १२ जणांवर गुन्हे दाखल

 


फलटण चौफेर दि २९

राजुरी तालुका फलटण गावच्या यात्रेत कुस्ती लावण्याच्या कारणावरून दोन गटात मारामारी झाल्याची घटना घडली आहे याबाबत परस्परविरोधी तक्रारीने एकूण १२ जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिथून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी विनोद किसन सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक २६ रोजी राजुरी गावच्या यात्रेत कुस्ती लावण्याच्या कारणावरून झालेल्या शाब्दिक बाचाबाची मुळे संशयित ज्ञानदेव आनंदा गावडे, पंकज ज्ञानदेव गावडे, मधुकर आनंदा गावडे,बाळू उर्फ प्रथमेश ज्ञानदेव गावडे व ओंकार संपत सांगळे सर्व राहणार राजुरी यांनी कुरवली पाटी येथील सावतामाळी हॉटेलच्या समोर पोत्यातून आणलेल्या तलवारीने डोक्यात व हातावर तलवारीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे तर दुसऱ्या फिर्यादीत ज्ञानदेव आनंद गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीत संशयित विनोद किसन सांगळे, दर्पण बाळासो सांगळे, यशराज विनोद सांगळे, धीरज शरद सांगळे, रोहन उर्फ पिनू अंकुश सांगळे, बाळासो येंकू शेंडगे व सोनबा येंकू शेंडगे सर्व राहणार राजुरी यांनी दिवा दिनांक २६ रोजी पुतण्याची नेमण्यात आलेली कुस्ती थांबवल्याच्या कारणावरून मला व माझा मुलगा पंकज याला जीवे मारण्याच्या उद्देशाने जीवघेणा हल्ला केल्याचे म्हटले आहे  पुढील अधिक तपास पोलीस नाईक आडके करीत आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.