फलटण चौफेर दि २१ साखरवाडी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजीमहाराज जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.प्रारंभी साखरवाडी शिक्षण संस्थेचे संचालक राजेंद्र शेवाळे यांचे शुभहस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.संस्था सचिव तथा माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिला ताई जगदाळे , पर्यवेक्षक तुळशीदास बागडे , सांस्कृतिक विभाग प्रमुख हरिदास सावंत इत्यादींनी अभिवादन केले.विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनीनी पाळणा म्हणून , नृत्य करून , मनोगतातून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.पर्यवेक्षक श्री बागडे सर , सहाय्यक शिक्षक श्री सावंत सर यांनी मनोगते व्यक्त केली.सांस्कृतिक समिती सदस्य कुंभार सर , युवराज बाबडे सर, सौ जगताप मॅडम,सौ गायकवाड मॅडम तसेच रासकर सर यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.