Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बिबी ता फलटण येथील दोघेजण सातारा जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार

  


फलटण चौफेर दि २७

 बिबी ता फलटण येथील  किरण रमेश आवारे, वय २० वर्ष, रा. बिबी, ता. फलटण, जि. सातारा. व कुमार लालासो काकडे, वय २१ वर्ष, रा. बिबी,  फलटण, जि. सातारा यांचेवर जबरी चोरी करणे, दरोडयाची तयारी करणे, दुखापतकरून शिविगाळ दमदाटी करून विनयभंग करणे असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने फलटण ग्रामिण पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक  सुनिल महाडीक यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्द‌पार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री. राहुल आर. धस, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यानी केली होती,टोळीमधील इसमांना दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर कायदेशीर कारवाई करूनही से जामीनावर बाहेर आल्यानंतर वेळोवेळी त्यांचेवर अटक, प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेवर झाला नाही अगर त्यांचे गुन्हेगारी कृत्यांमध्येसुधारणा झाली नसुन ते सातत्याने गुन्हें करीत होते तसंच त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्याने त्यांचा लोकांनाफार मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता, अशा इसमांवर सर्वसामन्य जनतेमधून कडक कारवाई करणेची मागणी होत होती.वरील टोळीस समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा चांचे समोर सुनावणी होवून त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पूर्ण सातारा जिल्हयातून दोन वर्षाकरीता हडपारीचा आदेश पारीत केला आहे.नोव्हेंबर २०२२ पासुन म.पो.का. कलम ५५ प्रमाणे १९ उपद्रवी टोळयांमधील ६३ इसमांना, म.पो.का.कलम ५६ प्रमाणे १७ इसमांना व ग.पो.का. कलम ५७ प्रमाणे ०२ इसांना असे एकुण ८२ इसमांचे विरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.या कामी हपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या चतीने श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मागदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हें शाखा, सातारा, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक तानाजी माने, पो. हवा. प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, फलटण ग्रामिण पोलीस ठाणेचे ना. हवा. वैभत्र सूर्यवंशी, पो. ना. श्रीनाथ कदम यांनी योग्य पुरावा सादर केला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.