फलटण चौफेर दि २७ :- श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल, जाधववाडी येथे दि २५रोजी पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये २ किलोमीटर या गटात १० वर्षे वयोगट खालील श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर चा विद्यार्थी राजवीर धीरज कचरे इयत्ता तिसरी याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन चे अध्यक्ष व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर,तसेच गव्हर्निंग कौन्सिलचे पदाधिकारी , रमणशेठ दोशी, चंद्रकांत पाटील , पुरूषोत्तम राजवैद्य , शिरीषकुमार दोशी, रणजित निंबाळकर , क्रिडा समितीचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव घोरपडे,फ.ए. सोसायटीचे प्रशासन अधिकारी निकम सर फलटण एज्युकेशन चे क्रिडा शिक्षक घोरपडे सर,धुमाळ सर,.तायाप्पा शेंडगे सर, पवार सर तसेच सातारा जिल्ह्याचे अॅथलेटीक कोच मोरे सर,शाळेच्या चेअरमन आदरणीय श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर ,व्हाईस चेअरमन आदरणीय सौ.वसुंधरा नाईक निंबाळकर, व्यवस्थापन समितीच्या सौ.लोंढे मॅडम, मुख्याध्यापिका सौ.जाधव मॅडम, सर्व पालक,शिक्षक, विद्यार्थी मित्र यांनीराजवीरचे अभिनंदन केले. राजवीरला मार्गदर्शन करणारे त्याचे पालक श्री.धीरज कचरे व शिक्षक श्री.नाळे सर यांची नेहमीच प्रेरणा मिळत असते. यापूर्वीच नुकतेच त्याने महाराष्ट्र राज्य सबज्युनिअर मैदानी अजिंक्यपद अॅथलेटीक्स स्पर्धा मधेही तालुका स्तर,जिल्हा स्तर व राज्य स्तरावर ही प्रथम क्रमांक मिळवला आहे . या स्पर्धेमध्ये ६० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात त्याने नवीन विक्रम वेळ ८.५० से करून सुवर्णपदक प्राप्त केले. सर्वानी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व कौतुक केले