विडणी (योगेश निकाळजे) - विडणी येथील उमाजी नाईक जयंती उत्सव मंडळाच्यावतीने राजे उमाजी नाईक यांची १९२ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यानिमित्त मंडळाच्या वतीने जेजुरी या ठिकाणाहून ज्योत आणण्यात आली,सदर ज्योतीचे स्वागत सरपंच सागर अभंग यांच्या हस्ते करण्यात आले व राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास सरपंच सागर अभंग, सचिन अभंग, राजे उमाजी नाईक जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष लखन मदने,सोनू मदने, धनाजी मदने, प्रा.सागर मदने,श्री मदने, मिथुन जाधव, युवराज मदने, दादा गुजले, दादा मदने, आबा मदने, बंटी मदने, सौरभ मदने, सोमा गुजले, शुभम गुजले, निलेश गुजले, साहिल गुजले, प्रसन्न गुजले, साहिल मदने, खासाबा आडके, बाळू बुधावले दत्ता आडके, दत्ता जाधव हे उपस्थित होते.
दरम्यान ग्रामपंचायती मध्येही राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस सरपंच सागर अभंग यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.