Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वलांडी(लातूर)येथील पीडित कुटुंबाला न्याय व मदत मिळण्यासाठी फलटण शहर हिंदू खाटीक समाजच्यावतीने निवेदन

 



फलटण चौफेर दि ४ :- मौजे वलांडी, ता. देवणी, जि. लातूर येथील मागासवर्गीय कुटुंबातील ६ वर्ष वयाच्या लहान मुलीवर निर्दयी आरोपीने अत्याचार केला आहे त्या पिडीत कुटुंबीयास न्याय व मदत मिळावी याकरिता फलटण शहर हिंदु खाटीक समाज यांच्या वतीने विविध मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना देण्यात आले.


 उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, मौजे वलांडी, ता. देवणी, जि. लातूर येथील अत्यंत गरीब, मागासवर्गीय कुटुंबातील ६ वर्ष वयाच्या लहान मुलीवर निर्दयी आरोपीने अत्याचार केला आहे. त्याबाबतचा अट्रोसिटी तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.


पिडीत कुटुंबात वयोवृद्ध आजाराने ग्रस्त सासु, सासरे, एक विधवा महिला व त्यांच्या ४ लहान मुली, एक लहान मुलगा असा परिवार असून सर्व कुटुंबियांचा उदरनिर्वाह पीडितेच्या विधवा आईवरच आहे, जी मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करते आहे.  पिडीत व आरोपीचे घर एकमेकांच्या समोर आहे त्यामुळे पिडीत कुटुंबाची सोय इतरत्र करावी अथवा पिडीत कुटुंबीयास पोलीस संरक्षण देण्यात यावे. पिडीत कुटुंबीयास शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात यावी तसेच पिडीत बालिकेच्या पुनर्वसनाचा (शैक्षणिक आदी) संपूर्ण खर्च शासनाने उचलावा. सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे व पिडीत कुटुंबियात अल्पवयीन ४ मुली, १ मुलगा असल्याने त्यांना बाल संगोपन योजनेअंतर्गत (स्पेशल केस खाली) मदत देण्यात यावी. संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आरोपीला व त्याच्या कुटुंबियांना गाव बंदी करण्यात यावी जेणेकरुन गावात धार्मिक/जातीय तेढ अथवा तणाव निर्माण होणार नाही याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात यावी अशी मागणी फलटण शहर हिंदु खाटीक समाज यांच्या वतीने करण्यात आली आहे.

फलटण शहर हिंदु खाटीक समाज यांच्या वतीने  फलटण शहरात मोर्चा काढत पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशा घोषणा करण्यात आल्या. यावेळी हिंदू खाटीक समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.